स्पाइन डीसीसे
साधारण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात की ना कधी कमी जास्त काळासाठी मणके दुखीचा (Spine Pain) त्रास होतोच. आपल्या शरीराला आधार देण्याचे काम पाठीचे मणके करत असतात. आपल्या शरीरात एकूण ३३ मणके असतात. एकूण ३३ मणक्यांना पाठीचा कणा असे म्हणतात. मानेत ७, पाठीत १२, कमरेत ५ त्याखाली ५ मणके जुळून आलेले त्रिकोणी माकडहाड (संक्रम) आणि त्याखाली ४ मणके जुळून आलेले कॉकीक्स. मणक्यांमधून मेंदूकडून आदेश घेणाऱ्या व जाणाऱ्या मज्जारजूंचा गोफ (Spinal Cord) कमरेपर्यंत आलेला असतो. प्रत्येक मणका एक दुसऱ्याला अस्थिबंध (Facet Joints) आणि स्नायू I (Muscles) यांनी जोडलेला असतो. प्रत्येक दोनमणक्यांमध्ये कुर्चा (Disc) असते. ती शॉक अॅबसॉर्बरसारखे काम करते. मणक्याच्या वरिलपैकी कोणत्याही भागावर ताण आल्यास, वयोमानानुसार झीज झाल्यास अथवा त्याला इजा झाल्यास मणक्याचा त्रास उद्भवतो ?
मणका दुखण्याची कारणे :
अप्रत्यक्ष कारणांमध्ये आपल्या उठण्या-बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांचा समावेश होतो. तसेच वयोमानानुसार मणक्यांची होणारी झीज, हाडे ढिसूळ होणे इत्यादी कारणांमुळे मणक्यांमध्ये अस्थिरता निर्माण होते. अशा रुग्णांमध्ये विविध प्रकारचे ताण-तणाव, धक्के यामुळे कुर्चा सुकणे, फाटणे किंवा सरकणे (Slip disc) असे घडू शकते. कुर्चेची होणारी झीज अथवा मणक्यांमधील अस्थिरतेमुळे अस्थिबंधावर ताण पडून त्याचा त्रास (Facetal arthropathy) होऊ शकतो.
मणका दुखण्याची लक्षणे पाठ दुखणे, पायात दुखणे जाणे (Sciatica), पायाला मुंग्या येणे, पायात जडपणा येणे,
कमरेचे स्नायू कडक होणे, हालचालीनंतर वेदनांची तीव्रता वाढणे, मान दुखणे, हात दुखणे, हातात मुंग्या येणे
इत्यादी यासारखी लक्षणे दिसून येतात.
उपचार :
बहुतांश रुग्णांना औषधोपचार, योग्य व्यायाम, हालचालीतील पथ्य यामुळे आराम होतो. पण ज्या रुग्णांना
वरील उपचारांनी फायदा होत नाही त्यांना यापूर्वी शस्त्रक्रिया (ऑपरेशन) शिवाय पर्याय उरत नसे. पण आता पेन
मॅनेजमेंटद्वारे जवळजवळ ८० , ९० टक्के रुग्णांना विना ऑपरेशन मणक्यांच्या आजारावर आराम होऊ शकतो.
पेन मॅनेजमेंट ही
अमेरिकेतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अॅलोपॅथी एक उपचार पद्धती आहे. यामध्ये विना ऑपरेशन उपचार केले जातात. यात सी-आर्म (लाइव्ह एक्स-रे मशीन) अथवा सीटी स्टॅन मशीनच्या सहाय्याने आजारानुसार योग्य
त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या इंजेक्शनद्वारे औषधी पोहोचवली जातात. मणक्याचा आजार असणाऱ्या
रुग्णांमध्ये योग्य त्या कुर्चाजवळ अथवा नसजवळ सूज कमी करणारे इंजेक्शन मशीनद्वारे दिले जाते. तसेच
सरकलेला कुर्चा आकुंचन पावण्यासाठी अथवा नसवरील दाब कमी करण्यासाठी ओझोन थेरेपी, रेडिओ फ्रिक्वेन्सी
थेरपीचा वापर केला जातो. न्युक्लिओटोम मशीनने दोन मणक्यांमधील अटकलेली गादी सुईद्वारे काढण्यात येते.
त्याचप्रमाणे मणक्यांच्या [अस्थिबंधातून/सांध्यातून उद्भवणाऱ्या वेदनांवर रेडिओफ्रिक्वेन्सी अॅब्लेशन हा
उपाय सर्वोत्तम आहे.
फायदेः
या उपचारपद्धतीत दुष्परिणामांची शक्यता नगण्य आहे. दुखण्याच्या मुळाशी इंजेक्शनद्वारे औषध थेट पोहोचवले जात असल्यामुळे त्याची मात्रा तोंडावाटे लागणाऱ्या औषधाच्या मानाने अत्यंत कमी असते. त्यामुळेत्याचे शरीराच्या इतर भागावर होणारे दुष्परिणाम टळतात. या उपचारपद्धतीचे अनेक फायदे आहे. एक तर उपचाराची अचुकता, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज नाही. नगण्य दुष्परिणाम, कमी खर्च आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दीर्घकाळाच्या वेदनांपासून विना ऑपरेशन मुक्ती. तर एकूणच पेन मॅनेजमेंट ही उपचारपद्धती मणक्यांच्या आजारांवर वरदान ठरू पाहत आहे.
जर तुम्हाला स्पाईन चा त्रास होत असेल किंवा त्या संबधीची काही लक्षणे वाटत असतील तर संपर्क करा डॉ. प्रसाद कासलीवाल ह्यांना स्पाईन स्पेश्यालिस्ट इन नाशिक .